WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

उच्च शिक्षीत समाज घडविण्यावर भर – उपाध्यक्ष टी. रहमान


उच्च शिक्षीत समाज घडविण्यावर भर – उपाध्यक्ष टी. रहमान

कृष्णा अँटीऑक्सिडन्ट कंपनीचा ३६ वा वर्धापन दिन, भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

कंपनीच्या १२२ कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान, जपला सामाजिक बांधीलकीचा वसा

 

चिपळूण (प्रतिनिधी):- कृष्णा अँटीऑक्सिडन्ट कंपनीने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. कंपनीच्या सीएसआर फंडातून खडपोली पंचक्रोशी शैक्षणिक व विविध उपक्रमात सक्रिय सहभाग दर्शवला आहे. आता गेल्या तीन वर्षांपासून कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून माणुसकीचा धर्म जपला आहे, असे प्रतिपादन कृष्णा अँटीऑक्सीडन्ट कंपनीचे संचालक टी. रेहमान यांनी कृष्णा अँटीऑक्सिडन्ट कंपनीच्या ३६ वर्धापन दिनानिमित्त बोलतांना केले. यावेळी कंपनीतील १२२ कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून औद्योगिक क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे.

कृष्णा अँटीऑक्सिडन्ट कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट अशोक पाटील,  कंपनीचे शंतनु मलिक, अभय शेरीकर, वशिष्ठ जावकर, विनायक सुतार, दिनेश कदम, एचआर सुयोग चव्हाण आदी उपस्थित होते. या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या हस्ते झाले.  यावेळी कृष्णा अँटीऑक्सिडन्ट कंपनीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे कौतुक करतांना रक्तदानामुळे अनेकांचे जीव वाचले आहेत. यामुळे रक्तदान महत्वाचे असून आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन केले.

प्रास्ताविकात कंपनीचे एचआर सुयोग चव्हाण यांनी कृष्णा अँटीऑक्सिडन्ट कंपनीची ८ मे १९९० रोजी झाली आहे. या कंपनीने ५५० कर्मचाऱ्यांना रोजगार मिळवून दिला आहे. तसेच कंपनीने नेहमीच सामाजिक दायित्व जपले आहे. खडपोली पंचक्रोशीतील शाळांना नेहमीच सहकार्याचा हात दिलेला आहे. यामुळे शाळांची पटसंख्या वाढताना दिसत आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या वर्षी ६० तर गेल्यावर्षी ९० रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर  यावर्षी १०० रक्तदात्यांचे उद्दिष्ट बाळगण्यात आले असल्याचे चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.

या रक्तदान शिबिरासाठी रेड क्रॉस सोसायटी आणि डेरवण येथील वालावलकर रुग्णालय रक्तपेढीचे सहकार्य लाभले आहे. भव्य रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी कृष्णा अँटिऑक्सिडंट कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने विशेष मेहनत घेतली. तर या शिबिराला अलोरे – शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरतकुमार पाटील, योगेश हुंबरे, श्री. माने यांनी भेट दिली. यावेळी कंपनीच्या वतीने त्यांचा एकत्रित सन्मान करण्यात आला. या शिबिराच्या आयोजनाबद्दल या सर्वांनी कंपनीचे कौतुक केले.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!