WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

मोरोशी येथे उद्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर


मोरोशी येथे उद्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

राजापूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली मोरोशी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दि. १० मे २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत गुंडीबाई पटांगण, गांवकर वाडी, मोरोशी (ता. राजापूर) येथे पार पडणार आहे.

या उपक्रमाचे आयोजन श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळ, श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल लांजा, श्री स्वामी समर्थ नेत्र रुग्णालय लांजा आणि श्री देवी गुंडीबाई चॅरिटेबल ट्रस्ट, राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून ज्येष्ठ नागरिकांची विविध आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन केले जाणार आहे. रक्तदाब, रक्तातील साखर (मधुमेह), वजन तपासणी, स्त्रीरोग तपासणी, हाडांची तपासणी, ईसीजी, दमा-अस्थमा तपासणी, कान-नाक-घसा तपासणी तसेच डोळ्यांची तपासणी अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय आहाराबाबत मार्गदर्शन व मोफत औषध वितरणही करण्यात येणार आहे.

या शिबिरासाठी राजापूर-लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सहाय्यक आयुक्त समाजकल्याण रत्नागिरी दीपक घाटे, श्री देवी गुंडीबाई चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त मंडळ, संस्था प्रतिनिधी योगेश पाटील, डॉ. सुहास खानविलकर, डॉ. सुहास देसाई, अनिता आत्माराम नारकर, शशिकांत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या मोफत आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी शशिकांत चव्हाण (९६०४०२०६३८) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!