लकी ड्रॉ मध्ये लागलेली गाडी दिली कामगारांना
कामगांरासाठी पाकळे फाऊंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम
चिपळूण : शेखर निकम प्रतिष्ठान आयोजित आमदार चषक 2026 स्पर्धेनिमित्त उद्योजक सचिन पाकळे यांनी 300 कूपन खरेदी करून लकी ड्रॉमध्ये सहभाग घेतला होता. या सोडतीत त्यांच्या कंपनीच्या नावावर मोटारसायकल लागली. मात्र, ही मोटारसायकल स्वतःकडे न ठेवता कामगारांना देण्याचा निर्णय घेतला. कंपनीतील कामगारांमधून स्वतंत्र लकी ड्रॉ काढत सामाजिक बांधिलकी जपली.
आमदार शेखर निकम यांच्या हस्ते ही सोडत पार पडली. सुभाष पाकळे फाऊंडेशनच्या माध्यमातून सचिन कात कंपनी व तिरुपती कात कंपनी, तसेच सचिन पाकळे व संजय पाकळे यांनी हा कामगाराभिमुख उपक्रम राबविला.
कामगारांमधून काढलेल्या या विशेष लकी ड्रॉमध्ये एका भाग्यवान कामगाराला मोटारसायकल प्रदान करण्यात आली. याशिवाय मिक्सर, कुकर, हॉटपॉट, स्टील डबे, पाण्याच्या टाक्या, टॉर्च, इस्त्री, ब्लूटूथ स्पीकर, गॅस शेगडी, सिलिंग फॅन आदी वस्तूंचेही वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास यावेळी आमदार शेखर निकम, उद्योगपती सचिन पाकळे, पूनम पाकळे, इरा डेव्हलपमेंटचे सुरेश सावर्डेकर, महावितरणचे निवृत्त अधिकारी अशोक काजरोळकर, शेखर निकम प्रतिष्ठानचे देवराज गरगरटे, सतीश सावर्डेकर, राजेश सुर्वे, विकास भंडारी, सुमित भंडारी तसेच सचिन कात व तिरुपती कात कंपनीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेच्या यस्वीतेसाठी संदिप घाग, सचिन गुरव, बाळा सावंत, सुयोग खेडेकर, सुरेश सूर्यवंशी, शरद चव्हाण, प्रणय चव्हाण, सुगंधा घाणेकर, सुरक्षा घाग, प्रणय साबळे, अनुराग चव्हाण, प्रणय मोरे, महेश सावंत, अमित म्हापार्ले, राहुल पवार, सुमित, सुजित बिजितकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.











