फार्मर कप साठी मोरगिरीच्या शेतकऱ्यांमध्ये उत्साह
पोलादपूर – जलसंधारणाच्या कामास गती मिळण्यासाठी पाणी व राज्य सरकारच्या कृषी विभागाने यावर्षीपासून कोकण विभागात देखील फार्मर कप स्पर्धेचे आयोजन केले आहे. कोकण विभागातील सर्व तालुक्यात ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यातील मोरगिरी गावाने फार्मर कप स्पर्धेसाठी मुसंडी मारली आहे.
मोरगिरी गावात पाणी फाउंडेशन व कृषी विभाग च्या फार्मर कप स्पर्धेत शेतकरी गटाने सहभाग घेतला आहे. या घटने रासायनिक शेतीला फाटा देत गट शेती द्वारे विषमुक्त शेती कडे वाटचाल सुरू ठेवली आहे. यासाठी गावामध्ये दशपर्णी अर्क , गौकृपा बनवून वापर चालू करून विद्यापीठ शिफारशी नुसार भात पिक तंत्रज्ञान वापर करून स्पर्धेत सहभागी होत आहोत. शेतकरी वर्ग खुश होऊन कामकाज करत आहे. सध्या मोरगिरी मध्ये फार्मर कप स्पर्धेसाठी मोठे उत्साहाचे वातावरण आहे.
Views: 249












