WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

उक्ताड वाहनतळ झाले सुरक्षित!


उक्ताड वाहनतळ झाले सुरक्षित

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या सूचनेनुसार तातडीने कार्यवाही

चिपळूण : नगर परिषदेच्या उक्ताड येथील अटलबिहारी वाजपेयी वाहनतळाच्या सुरक्षेसाठी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी केलेल्या पाहणीनंतर प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली आहे. बुधवारी या वाहनतळाच्या तिन्ही बाजूंना गेट बसवून ते सुरक्षित करण्यात आले असून गेट बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

उक्ताड येथील हा वाहनतळ बाजारपेठेपासून दूर असल्यामुळे गेल्या चार वर्षांपासून जवळपास वापराविना पडून असल्याचे पाहणीत निदर्शनास आले होते. तसेच तिन्ही बाजूंनी गेट नसल्याने नगर परिषदेच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने गेट बसवून मालमत्तेची निगा राखण्याचे स्पष्ट आदेश दिले होते.

नगराध्यक्षांच्या सूचनेनुसार प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करत वाहनतळाच्या तिन्ही बाजूंनी गेट सुरक्षित केले आहेत. त्यामुळे अनधिकृत प्रवेशास आळा बसणार असून नगर परिषदेच्या मालमत्तेची सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे.
दरम्यान, हा वाहनतळ सध्या वाहनचालकांच्या प्रत्यक्ष उपयोगात येत नसल्याने भविष्यात या जागेचा योग्य वापर करून नगर परिषदेला उत्पन्नाचा स्रोत निर्माण करता येईल का, याबाबतही विचार सुरू आहे. या संदर्भातील विषय लवकरच होणाऱ्या नगर परिषद कौन्सिल बैठकीत सभागृहासमोर मांडण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते.
नगराध्यक्षांच्या पाहणीनंतर तातडीने झालेली ही कारवाई प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे उदाहरण ठरत असून, आगामी काळात या महत्त्वाच्या मालमत्तेबाबत सकारात्मक आणि दूरगामी निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!