WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

भारत बंदची हाक!


भारत बंदची हाक!

काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांच्याकडून सहभागी होण्याचे आवाहन

चिपळूण : देशातल्या विविध दहा कामगार संघटनांनी गुरुवार, दि. १२ फेब्रुवारी, २०२६ रोजी “भारत बंद” ची हाक दिलेली आहे. शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनी सुध्दा या भारत बंदला पाठींबा दिलेला आहे. या बंदला काँग्रेसने देखील पाठिंबा दर्शवला असून या बंदमध्ये प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार उत्तर रत्नागिरीतील काँग्रेस पक्षाने सहभागी होऊन पाठिंबा द्यावा, असे आवाहन काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी केले आहे.

यानुसार केंद्र शासनाने कामगार कायद्यांमध्ये केलेल्या विविध बदलांमुळे कामगारांच्या समोर विविध प्रश्न व समस्या निर्माण झालेल्या आहेत. कामगार कायद्यातील बदलांमुळे कामगारांच्या हिताला बाधा पोहोचली आहे व कामगारांच्या हाताला काम मिळण्याच्या संधी कमी झालेल्या आहेत. केंद्र शासनाचे आर्थिक धोरण सुध्दा कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या विरोधात आहे.

यानुसार देशातल्या विविध दहा कामगार संघटनांनी गुरुवार दिनांक गुरुवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक दिलेली आहे. शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनी सुद्धा या भारत बंदला पाठिंबा दिलेला आहे.

ही बाब लक्षात घेता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या भारत बंदला काँग्रेस पक्षाने पाठींबा देण्याबाबतच्या सुचना प्राप्त झालेल्या आहेत. काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून उत्तर रत्नागिरीतील काँग्रेसने भारत बंदमध्ये पक्षाच्या वतीने सहभागी होऊन संपूर्ण पाठींबा द्यावा, असे असे आवाहन सोनललक्ष्मी घाग यांनी केले आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!