WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

तेरा उमेदवारांवर अनामत रक्कम जप्तीची नामुष्की


तेरा उमेदवारांवर अनामत रक्कम जप्तीची नामुष्की

काँग्रेस, शरद पवार गटासह अजित पवार गटालाही फटका

चिपळूण : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत चिपळूण तालुक्यातील एकूण १३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यामध्ये जिल्हा परिषद गटातील ५ तर पंचायत समिती गणातील ८ उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या दोन्ही पक्षांचा प्रत्येकी एकमेव उमेदवार रिंगणात असताना त्यांनाही अनामत रक्कम वाचवता आली नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातील ३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याने आमदार शेखर निकम यांना राजकीय फटका बसल्याची चर्चा आहे.

चिपळूण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी अनेक ठिकाणी तिरंगी आणि चौरंगी लढती रंगल्या. पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना सर्वाधिक ७ जागांवर यश मिळाले. शिंदेसेनेला ४, भाजपला ३ आणि ठाकरेसेनेला ४ जागा मिळाल्या. मात्र या चुरशीच्या लढतीत १३ उमेदवारांना आवश्यक मते न मिळाल्याने त्यांची अनामत रक्कम जप्त झाली.

जिल्हा परिषद गटातील जप्त अनामत
जिल्हा परिषद गटात पुढील ५ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली :
गीता जाधव (वंचित बहुजन आघाडी) – कळवंडे गट
अमिता अरुण मोडक (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट) – शिरगाव
निलेश अनंत चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) – उमरोली
योगेश यशवंत खांडेकर (अपक्ष) – उमरोली
विकास भागोजी डिके (बसपा) – कोकरे

पंचायत समिती गणातील जप्त अनामत रक्कम
पंचायत समिती गणात ८ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली :
मुमताज दलवाई (काँग्रेस) – कळवंडे
महेश महाडिक (ठाकरेसेना) – पेढे
विलास तांदळे (ठाकरेसेना) – अलोरे
फैसल सय्यद (अपक्ष) – वेहेळे
सागर सावंत (ठाकरेसेना) – सावर्डे
सायली बंगाल (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) – गुढे
बुद्धदास सकपाळ (बसपा) – वहाळ
अर्चना रसाळ (अपक्ष) – कुटरे

प्रमुख पक्षांना धक्का
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी तालुक्यात केवळ शिरगाव गणात उमेदवार उभा केला होता. मात्र त्या उमेदवारालाही आवश्यक मते न मिळाल्याने डिपॉझिट जप्त झाले. काँग्रेसने पंचायत समितीत केवळ कळवंडे गणातून उमेदवार दिला होता, पण त्यांनाही अनामत रक्कम राखता आली नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांना तालुक्यात मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

अनामत रक्कम जप्त होण्याचे कारण
निवडणूक नियमांनुसार अनामत रक्कम वाचवण्यासाठी एकूण वैध मतांच्या किमान एक-आठवा (1/8) इतकी मते मिळवणे आवश्यक असते. संबंधित उमेदवारांना ही किमान मतांची मर्यादा गाठता आली नसल्याने त्यांची अनामत रक्कम जप्त झाली.

या निकालामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता असून, आगामी स्थानिक राजकारणात याचे पडसाद उमटतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!