WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

संपामुळे ‘महसूल’चे काम ठप्प


संपामुळे ‘महसूल’चे काम ठप्प

अधिकारी – कर्मचाऱ्यांनी केली निदर्शने

चिपळूण : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या संपात येथील महसूलचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्याने शहरासह तालुक्यातील ग्रामस्थांना याचा फटका बसला. या संपामुळे नागरिकांना उतारे, फेरफार नोंदणी, उत्पन्न, जात व रहिवासी प्रमाणपत्र मिळणे कठीण झाले आहे. सध्या शैक्षणिक प्रवेशाचा काळ जवळ येत असल्याने दाखल्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे.

विविध मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या संपात महसूलचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाल्याने नागरिकांना त्याचा फटका बसला. अधिकारी, कर्मचारी संपात सहभागी असल्याने तहसील तसेच प्रांत कार्यालयात शुकशुकाट होता. गुरुवारी संपात सहभागी झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. सरकारने तत्काळ कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी करण्यात आली. तहसील तसेच प्रांत कार्यालयातील कर्मचारी संपात सहभागी झाल्याने नागरिकांची तसेच दैनंदिन शासकीय कामे रखडली आहेत. विविध दाखल्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांना फटका बसला. शासनाने संपावर तोडगा काढून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!