आमदार प्रमोद जठार यांचे चिपळुणात जोरदार स्वागत
🔷जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
🔷फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांच्या गजरात कार्यकर्त्यांचा जल्लोष
चिपळूण : महाराष्ट्र विधानपरिषद आमदार म्हणून निवड झाल्यानंतर मा. प्रमोद जठार यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला. त्यानिमित्त आहे. आ. जठार यांनी शनिवारी (ता. 9) रात्री चिपळूण शहर आणि चिपळूण ग्रामीण मंडलातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेऊन आभार मानले. तसेच सर्वांशी संवाद साधला.

मार्कंडी येथील भाजप संपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चिपळूणमध्ये मार्कंडी कार्यालयाजवळ आमदार जठार यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ढोलपथकाच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुधीरकाका भागवत यांची आमदार जठार यांनी भेट घेतली. यावेळी चिपळूण शहर आणि चिपळूण ग्रामीण मंडलाच्या वतीने मंडल अध्यक्ष विनोद भुरण आणि शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी यांनी दोन्ही मंडलांच्या वतीने आमदार जठार यांचा सत्कार केला.
या वेळी रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, चिपळूणच्या उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा सरचिटणीस सुप्रिया उतेकर, जिल्हा चिटणीस ॲड्. नयना पवार, नगरसेविका रसिका देवळेकर, नगरसेविका अंजली कदम, नगरसेविका शितल रानडे, नगरसेवक शुभम पिसे, नगरसेवक संदीप भिसे, पंचायत समिती सदस्य सौ. सायली वाजे, चिपळूण ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्ष आदिती गुडेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत शाह, यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी, चिपळूण शहर आणि चिपळूण ग्रामीण मंडलातील भाजपचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










