WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

चिपळुणात उद्या बाळासाहेब ठाकरे जयंती


चिपळुणात उद्या स्व.बाळासाहेब ठाकरे जयंती

नगर परिषदेत युतीच्या सभापतींचा पदग्रहण सोहळा

चिपळूण : शिवसेना चिपळूण शहरच्या वतीने शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा जयंती सोहळा व पालिकेतील नव्या सभापतींचा पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना शिवसैनिकांकडून मोठ्या उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळी १० वाजता चिंचनाका येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता नगर परिषद, चिपळूण येथे नगर परिषदेत निर्वाचित शिवसेना–भाजपा युतीच्या सभापतींचा पदग्रहण सोहळा पार पडणार आहे. चिंचनाका या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता शिवसेना शहर महिला आघाडीच्या वतीने हळदीकुंकू समारंभ पार पडणार आहे.

या कार्यक्रमांना माजी आमदार सदानंद चव्हाण तसेच चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष उमेश धोंडीराम सकपाळ उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनात, सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेना, शाखाप्रमुख, बूथप्रमुख तसेच सर्व निष्ठावान शिवसैनिकांनी वेळेवर व पूर्ण उपस्थितीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या आवाहनावर महिला आघाडी जिल्हाप्रमुख रश्मीताई गोखले, महिला आघाडी तालुकाप्रमुख सुप्रियाताई सुर्वे, महिला आघाडी शहरप्रमुख सौ. प्राजक्ता टकले, युवा सेना तालुका अधिकारी श्री. निहार कोवळे, युवा सेना शहर अधिकारी श्री. विनोद पिल्ले आणि युवती सेना शहर अधिकारी शिवानी शिंदे हेही उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना अभिवादन करताना, नव्याने निर्वाचित युतीच्या सभापतींच्या पदग्रहणामुळे चिपळूण नगर परिषदेच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!