WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

पंचायत समितीवर युतीचा भगवा फडकेल : प्रशांत यादव


 

पंचायत समितीवर युतीचा भगवा  फडकेल : प्रशांत यादव 

चिपळूण – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना -भाजप युती म्हणून निवडणूकीला सामोरे जात आहोत. युतीच्या माध्यमातून तालुक्यात सक्षम आणि कणखर उमेदवार देण्यात आले आहेत. या निवडणूकीत पंचायत समितीवर युतीचा झेंडा फडकलेला दिसेल, असा विश्वास भाजप नेते प्रशांत यादव यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी ४४ तर पंचायत समिती निवडणूकीसाठी ७२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी युतीतील सर्वांचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर भाजपनेते प्रशांत यादव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला चांगले यश मिळाले. युतीने पालिकेत एकहाती वर्चस्व राखले.  या यशानंतर युतीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत देखील युतीला चांगले यश मिळेल, युतीचा झेंडा पंचायत समितीवर फडकल्याशिवाय राहणार नाही.

या निवडणुकीसाठी युतीने सक्षम आणि जनमानसात सक्रीय असलेले तगडे उमेदवार दिलेले आहेत. आम्ही ताकदीने या निवडणुकीत उतरलो आहोत. ग्रामीण भागात विविध ससम्या आहेत. महायुती सरकारच्या माध्यमातून त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू. शिरगांव गणात कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार सहकार व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अॅड. नयना पवार यांना उमेदवारी देण्यात आली. तेथेही आम्हाला चांगले यश मिळेल. पंचायत समितीच्या गत निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संख्या सम-समान होते. मात्र या निवडणूकीत तालुक्यातून युतीला स्पष्टपणे कौल मिळेल.

 


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!