WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

लाठी-काठी विश्वविक्रमात गार्गी पुरोहितची दमदार कामगिरी


लाठी-काठी विश्वविक्रमात गार्गी पुरोहितची दमदार कामगिरी

 

चिपळूण – पारंपरिक मराठी युद्धकलेचा जागतिक स्तरावर गजर करणाऱ्या लाठी-काठी विश्वविक्रम उपक्रमात चिपळूणची कन्या गार्गी पराग पुरोहित हिने उल्लेखनीय सहभाग नोंदवत आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे. या यशामुळे विविध स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नवी मुंबई येथे झालेल्या या भव्य विश्वविक्रम उपक्रमात देशभरातील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या विश्वविक्रमासाठी लाठी राष्ट्रीय पंच सुरेंद्र शिंदे व सौ. कविता शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. शिस्त, एकाग्रता आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर गार्गीने सादर केलेल्या लाठी – काठीच्या सामूहिक प्रात्यक्षिकाने उपस्थितांची मने जिंकली. या उल्लेखनीय कामगिरीची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केल्याने हा क्षण सर्व सहभागींसाठी अभिमानाचा ठरला. या यशात गार्गीची जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण सराव यांचा मोठा वाटा राहिला. गार्गीचे वडील पराग पुरोहित हे शहरातील ‘रॉयल मेडिकल’चे संचालक असून, आई सौ. नीलम पुरोहित या प्राथमिक शिक्षिका आहेत. लाठी-काठी ही केवळ क्रीडा कला नसून, ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यपरंपरेशी जोडलेला समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. या कलेच्या माध्यमातून तरुण पिढीत शौर्य, आत्मविश्वास, शिस्त आणि संस्कृतीची जाणीव दृढ होत आहे. गार्गीच्या या यशस्वी कामगिरीमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!