चिपळूणमध्ये उद्या नितीन बानगुडे पाटील यांचे विशेष व्याख्यान
चिपळूण : श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूण यांच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून हे व्याख्यान उद्या, बुधवार दि. ६ मे रोजी सायंकाळी ५:३० वाजता पार पडणार आहे.
‘राष्ट्र पुरुषांचे आदर्श आणि नव्या पिढीची जबाबदारी’ या विषयावर प्रा. नितीन बानगुडे-पाटील मार्गदर्शन करणार आहेत. कै. कमलाकरशेठ चितळे व्याख्यानमालेअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर रंगमंच, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, मार्कंडी, चिपळूण येथे होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. मोहन मिरगल, कार्याध्यक्ष श्री. रमण डांगे, सचिव श्री. प्रभंजन पिंपुटकर, तसेच खजिनदार श्री. चंद्रशेखर सावले हे असून कार्यक्रमाचे प्रायोजक श्री. प्रकाश देशमुख आहेत.











