WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

अनारी दत्त मंदिराचा मंगळवारी प्रथम वर्धापन दिन


अनारी दत्त मंदिराचा मंगळवारी प्रथम वर्धापन दिन

चिपळूण : तालुक्यातील अनारी गावातील दत्त मंदिर येथे आज मंगळवार दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रथम वर्धापन दिन विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गतवर्षी ग्रामस्थ व भक्तांच्या सहकार्याने मंदिराचे भव्य बांधकाम पूर्ण झाले होते. त्या स्मरणार्थ यंदा पहिल्यांदाच वर्धापन दिनाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

वर्धापन दिनानिमित्त सकाळच्या सत्रात श्रींचा अभिषेक, होमहवन, दिंडी प्रदक्षिणा तसेच श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. दुपारच्या सत्रात भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भक्त सहभागी होणार आहेत. सायंकाळी आणि रात्रीच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. ह.भ.प. मनोज महाराज पवार (अनारी) यांचे कीर्तन होणार असून त्यानंतर वेहेळे गावच्या भजन मंडळाचा भजन कार्यक्रम रंगणार आहे. भजनानंतर श्री राम नाट्य नमन मंडळ (कामथे- हुमणे वाडी) यांचा पारंपरिक नमनाचा कार्यक्रम सादर होणार आहे.

या वर्धापन दिन सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असून ग्रामस्थांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आहे. या धार्मिक सोहळ्यास सर्व भाविकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन वरदानवाडी तरुण विकास मंडळ (अनारी–मुंबई) तसेच वरदानवाडी महिला मंडळ (मुंबई–अनारी) यांच्या वतीने करण्यात आले आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!