WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

तोतया पोलिसांनी वृद्धाला लुटले


तोतया पोलिसांनी वृद्धाला लुटले

🔴हातोहात लांबविली सोनसाखळी

🔴चिपळूण शहराती प्रकाराने खळबळ

चिपळूण : शहरात पोलीस असल्याचे भासवून दोन अज्ञात इसमांनी एका ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची सुमारे ९८ हजार रुपये किंमतीची सोनसाखळी लंपास केल्याची घटना रविवारी १५ रोजी सकाळी घडली. याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची फिर्याद शांताराम दौलतराव साळवी ( ८०, रा. गगनगिरी सोसायटी, रॉयलनगर चिपळूण, कुळयेवाशी, संगमेश्वर ) यांनी दिली आहे. साळवी हे रविवारी १५ रोजी सकाळी ११.३८ वाजण्याच्या सुमारास चिपळूण एस.टी डेपोच्या बाजूला, स्वागत हॉटेलसमोर जाणाऱ्या रस्त्यावर आले होते. त्यावेळी पाठीमागून मोटासायकल वरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी आपण पोलीस असल्याचे सांगून साळवी यांना अडविले. अंगावरील सोनसाखळी, हातातील घड्याळ व घराची चावी काढण्यास सांगितले. तसेच खिशातील रुमाल काढून देण्यास सांगितले. साळवी यांनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे सोन्याची सुमारे दोन तोळे वजनाची सोनसाखळी, घड्याळ व चावी रुमालात ठेवून दिली. त्या इसमांनी रुमालात सर्व वस्तू ठेवून तो परत दिल्याचे भासवून मोटारसायकलवरून तेथून पलायन केले. संशय आल्याने साळवी यांनी तत्काळ रुमाल तपासून पाहिला असता त्यात घड्याळ व घराची चावी होती; मात्र सोनसाखळी नव्हती. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या घटनेत सुमारे ९८ हजार रुपये किंमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची गळ्यातील चेन लंपास झाली आहे. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!