WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल


राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

चिपळुणात खळबळ, पोलिसांनी केली अटक

चिपळूण : तालुक्यातील एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी मंदार मंगेश कदम याने एका अल्पवयीन बालिकेला लग्नाचे आमिष दाखवून एप्रिल 2025 ते ऑगस्ट 2025 दरम्यान तिच्याशी शारीरिक संबंध ठेऊन तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित बालिकेच्या तक्रारीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूण पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेने चिपळूण तालुक्यात खळबळ उडाली असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!