WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या संचालकपदी विलास चिपळूणकर


श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या संचालकपदी विलास चिपळूणकर

चिपळूण: श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी मंडळाची निवड नुकतीच परांजपे मोतीवाले हायस्कूल चिपळूण येथे करण्यात आली. कार्यकारी मंडळाच्या या सभेमध्ये सर्वानुमते संचालकपदी विलास विठ्ठल चिपळूणकर यांची निवड करण्यात आली.

यावेळी संचालक मंडळापैकी कुंदन खातू, मल्लेश लकेश्री, सिद्धेश लाड, विनोद फणसे, शाळीग्राम विखारे, सुहास चव्हाण, सौ. शिल्पा जागुष्टे, विलास चिपळूणकर आदी संचालक उपस्थित होते. सभेमध्ये विलास चिपळूणकर यांची संचालक पदासाठी निवड करण्यात आली. श्री. चिपळूणकर हे गेली 25-30 वर्षे सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. चिपळूणतील ज्येष्ठ व्यावसायिक आहेत. 16-17 वर्षे चिपळूण अर्बन बँकेच्या संचालक मंडळावर आहेत. चिपळूण तालुका खरेदी विक्री संघांचे ते विद्यमान संचालक तसेच चिपळूण विविध कार्यकारी सेवा संघावर 25-30 वर्षे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर चिपळूण तालुका व्यापारी एकता संघाचे पदाधिकारी सुद्धा आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल माजी आमदार रमेशभाई कदम, सुचयअण्णा रेडीज, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत देवळेकर, माजी अध्यक्ष उदय गांधी, उपाध्यक्ष अशोक मेहेंदळे, उल्हास पवार, सौ.सई वरवाटकर, संस्थेचे विश्वस्त वसंत उदेग, डॉ.यतीन जाधव, सतीश अप्पा खेडेकर, ऍड. भाऊ दळी, राधिका पाथरे, डॉ. विखारे, ऍड. जीवन रेळेकर, रामशेठ रेडीज, निहार गुढेकर, दिलीप माटे, शिरीष काटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!