WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

अलोरे-खेर्डी-पोफळी गटातील महिलांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश


अलोरे-खेर्डी-पोफळी गटातील महिलांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

चिपळूण : अलोरे, खेर्डी व पोफळी गटातील शिवसेना उबाठा पक्षाशी संबंधित महिला कार्यकर्त्यांनी माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी सभापती धनश्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला.

नुकत्याच झालेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांतील पराभवानंतरही खचून न जाता संघटनात्मक पातळीवर नव्या जोमाने काम सुरू करण्याचा निर्धार धनश्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे. त्याच अनुषंगाने अलोरे-खेर्डी परिसरातील महिला कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांना शिवसेनेत सामील करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याला यश मिळत आज माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या कार्यालयात पक्षप्रवेश पार पडला.

प्रवेश केलेल्या प्रमुख पदाधिकारी
या वेळी शिवानी कासार (युवती तालुका अधिकारी, चिपळूण), रेश्मा चव्हाण (उपतालुका अधिकारी, अलोरे गट), सुकन्या पेढांबकर (उपतालुका अधिकारी, पोफळी गट), पल्लवी चव्हाण (विभाग प्रमुख, खेर्डी), स्मिता राजवीर (सरपंच, पिंपळी बुद्रुक), विनया झुजम, सिद्धी कदम, सरस्वती झुजम, सिद्धी महाजन, जयश्री सकपाळ (दादर शाखा प्रमुख), शामल घरत (कान्हे माजी सरपंच) तसेच अभिषेक प्रसाद (रिपब्लिकन सेना) आदींनी थेट शिवसेनेत प्रवेश केला.

जुने-नवे भेद नाही : सदानंद चव्हाण
प्रवेशकर्त्यांचे स्वागत करताना सदानंद चव्हाण म्हणाले की, पक्षात जुने-नवे असा कोणताही भेदभाव केला जाणार नाही. सर्वांना सन्मानाची वागणूक देत संघटन बळकट करण्यावर भर दिला जाईल. महिला आघाडी अधिक सक्षम करण्यासाठी हा प्रवेश महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी महिला आघाडी जिल्हा संघटक रश्मीताई गोखले, तालुकाप्रमुख संदेशबापू आयरे, रुपेश घाग, दिलीप चव्हाण, सुप्रिया सुर्वे, युवासेना तालुकाप्रमुख निहार कोवळे, प्राजक्ता टकले, सिद्धार्थ कदम, विनोद पिल्ले, शिवानी शिंदे, राजू गुजर, महेश डिघे, प्रकाश पाथरूड, रीना परमार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महिला आघाडी आणखी मजबूत
या प्रवेशामुळे चिपळूण तालुक्यात शिवसेनेची महिला आघाडी अधिक बळकट झाली असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. लवकरच विविध राजकीय पक्षांतील आणखी कार्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होणार असल्याचे संकेतही सदानंद चव्हाण यांनी दिले.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!