WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

देवरुखजवळ एक्सेस मिक्सरच्या धडकेत महिला ठार


देवरुखजवळ एक्सेस मिक्सरच्या धडकेत महिला ठार

देवरुख (ता. संगमेश्वर) : मारळ–बामणोली मार्गावर कातळस्टॉपजवळील मोरीच्या बांधकामस्थळी शुक्रवारी, १७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका पादचारी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या अपघाताबाबत दीपक पांडुरंग गराटे (वय ४४, रा. बामणोली, ता. संगमेश्वर) यांनी देवरुख पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयत महिला काजूच्या बागेत काम करून मारळ–बामणोली रस्त्याने पायी घरी जात असताना, एम.एच.०९ जी.झेड. २०१४ क्रमांकाच्या एक्सेस मिक्सर वाहनाचा चालक मोनू आत्मज मांगी (वय २३, रा. बर्खिया, ता. ललितपूर, उत्तर प्रदेश) याने निष्काळजीपणे व अतीवेगात वाहन मागे घेतले. यावेळी वाहनाने महिलेला जोरदार धडक दिली. मिक्सरचे चाक महिलेच्या पायावरून गेल्याने ती खाली पडली व डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी तिला ग्रामीण रुग्णालय देवरुख येथे दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या प्रकरणी गु.र.न. ०९/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) व मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!