WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

चिपळूण पंचायत समिती शिवसेना गटनेतेपदी विनोद झगडे


चिपळूण पंचायत समिती शिवसेना गटनेतेपदी विनोद झगडे

चिपळूण : पंचायत समितीतील शिवसेना गटनेतेपदी विनोद झगडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शनिवारी झालेल्या गटाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना–भाजप युतीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यात आली होती. यामध्ये शिवसेनेने १८ पैकी ११ जागांवर उमेदवार दिले होते. त्यापैकी चार जागांवर विजय मिळवत शिवसेनेने पंचायत समितीत आपले अस्तित्व ठळक केले आहे.

श्री. झगडे यांनी यापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ गटाला होईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.

गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य संदेशबापू आयरे, तालुकाप्रमुख रुपेश घाग, पं.स. सदस्या पूजा जवरत-जावळे, संजय जावळे, तालुका समन्वयक दिलीप चव्हाण, माजी गटनेते राकेश शिंदे, विभागप्रमुख राजेश शिंदे, सुरेश गोलमडे, निलेश चावरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!