WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

वृक्षारोपणातून स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी


वृक्षारोपणातून स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी

गणेश साबळे यांच्या पुढाकारातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

नागरिक, युवक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

चिपळूण, दि. २४ : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष गणेश साबळे यांच्या पुढाकारातून कोंढे येथील रिगल कॉलेजजवळ वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह नागरिक, युवक, विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करत “झाडे लावा – झाडे जगवा” हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला. “एक वृक्ष लावूया… पर्यावरण वाचवूया!” हा संदेश देत पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमास सरपंच माधवीताई कुळे, माजी पोलीस पाटील सुभाष नलावडे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप कुळे, संध्याताई करंजकर, मुंबई क्राईम ब्रांचचे पीएसआय अरविंद मोहिते, पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंग माळी, खाडीपट्ट्यातील ज्येष्ठ नेते विलास वाजे, शिवसेना संघटक अशोकराव नलावडे, नाना नलावडे, सुधाकर नलावडे, विकास कदम, राजू तांबिटकर, उमेश करंजकर, ऋषीकेश नलावडे, राष्ट्रवादीचे उपतालुकाध्यक्ष प्रभाकर सैतवडेकर, महेंद्र कुळे यांच्यासह अनेक नागरिक, युवक, विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक नलावडे आणि विलास वाजे यांनी केले. उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प करत भविष्यातही अशा पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!