WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

मी येतोय तुम्हीही आवर्जून या, काय समजलीव : प्रभाकर मोरे


मी येतोय तुम्हीही आवर्जून या, काय समजलीव!

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे यांचे आवाहन

राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलनाला राहणार उपस्थित

चिपळूण : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी पालवण (ता. चिपळूण) यांच्या वतीने दि. १३, १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाला ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम अभिनेते प्रभाकर मोरे हे विशेष उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

प्रभाकर मोरे यांनी स्वतः या साहित्य संमेलनाला आवर्जून उपस्थित राहणार असल्याचे जाहीर करत महाराष्ट्रातील सर्व साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. नामवंत साहित्यिकांचे विचार, ग्रामीण जीवन, कृषी व सहकार क्षेत्राशी निगडित विषयांवरील चर्चासत्रे आणि साहित्यिकांची उपस्थिती यामुळे हे संमेलन विशेष ठरणार आहे.

ग्रामीण संस्कृती, शेतकरी जीवन आणि सहकार चळवळीच्या विविध पैलूंना स्पर्श करणाऱ्या या राज्यस्तरीय संमेलनाकडे साहित्यविश्वाचे लक्ष लागले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात विविध साहित्यिक कार्यक्रम, परिसंवाद आणि मान्यवरांची भाषणे होणार असल्याने मांडकी पालवण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!