WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

महानिर्मितीच्या नाट्यस्पर्धेत ‘ द रेन इन द डार्क’ विजेता


 

महानिर्मितीच्या नाट्यस्पर्धेत ‘ द रेन इन द डार्क’ विजेता

चंद्रपूर द्वितीय तर भुसावळला तृतीय क्रमांक

चिपळूण, ता. २४ ः कोयना जलविद्युत केंद्र पोफळी आयोजित महानिर्मिती आंतर विद्युत केंद्र नाट्यस्पर्धेत कोराडी केंद्राच्या ‘ द रेन इन द डार्क ‘ या नाटकाने प्रथम क्रमाकांने बाजी मारली. तर चंद्रपूरच्या नाटकाने द्वितीय आणि भुसावळ ने तृतीय क्रमांक मिळवला. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात १९ ते २३ जानेवारी दरम्यान या स्पर्धा झाल्या.
नाट्यस्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमास अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांची विशेष उपस्थिती होती. या स्पर्धेत कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचे मिलिंद चन्ने दिग्दर्शित ‘द रेन इन द डार्क’ या नाटकाला प्रथम, महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूरचे मकरंद परदेशी दिग्दर्शित ‘दि अनॉनिमस’ या नाटकाला द्वितीय, आणि भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राचे राजेश पवार दिग्दर्शित ‘धुमस’ या नाटकाला तृतीय पारितोषिकाने गौरवण्यात आले. मिलिंद चन्ने यांना ‘द रेन इन द डार्क’ या नाटकासाठी दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक, राजेश पवार यांना ‘धुमस’ नाटकासाठी द्वितीय आणि शैलेंद्र पाटील यांना ‘बदाम सात’ नाटकासाठी तृतीय पारितोषिक मिळाले. उत्कृष्ट अभिनय (पुरुष) यामध्ये सचिन मोडकवर यांना ‘बाजीराव’ या भूमिकेसाठी प्रथम, शैलेंद्र पाटील यांना ‘न्यूटन, आर्किमिडीज, शकुनी’ या भूमिकांसाठी द्वितीय, प्रवीण मोरे यांना ‘रंगा’ या भूमिकेसाठी तृतीय पारितोषिक मिळाले. उत्कृष्ट अभिनय (स्त्री) यामध्ये ओवी ढवळे यांना ‘जान्हवी’ या पात्रासाठी प्रथम क्रमांक, प्राची दाणी यांना ‘उषाक्का’ या पात्रासाठी द्वितीय तर सायली देठे यांना ‘छाया व प्रमिला’ या भूमिकेसाठी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
लक्षवेधी अभिनय (पुरुष) यामध्ये ‘काळनाथ’ या भूमिकेसाठी महेश होनमाने यांना तर लक्षवेधी अभिनय (स्त्री) यामध्ये ‘आई व शकुंतला ‘ या भूमिकेसाठी रुपाली बोंबारे यांना पारितोषिक मिळाले. नेपथ्यासाठी पारितोषिक दिगंबर इंगळे (प्रथम) , रोशन वाघ (द्वितीय) आणि संदीप हिवरखेडकर (तृतीय) यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रकाश योजनेसाठी सचिन डांगोरे व धनराज गावनेर (प्रथम), अतुल बऱ्हाटे (द्वितीय) आणि महेश तुपे व विशाल जाधव (तृतीय) यांना पारितोषिक मिळाले. संगीतासाठी मिलिंद चन्ने व सुनिल मेश्राम (प्रथम), शिवाजी बोरकर व प्रियांका धंदर (द्वितीय), मोहित कांबळे (तृतीय) यांना पारितोषिक मिळाले. रंगभूषा व वेशभूषेसाठी गीतांजली झीरमुटे, रुपाली उफाडे व मानसी धानजी (प्रथम), ज्योती चंद्रमोरे (द्वितीय) आणि निकिता गोटे, चित्रा इंगळे(तृतीय) यांना पारितोषिक मिळाले. यावेळी महानिर्मितीचे पुरुषोत्तम वारजूरकर, संजय चोपडे, निवृत्ती कोंडावळे, संतोष चव्हाण, मच्छिंद्र गायकवाड, रोहिदास आव्हाड, प्रसाद निकम, माधुरी मुंडले, संतोष पुरोहित, सुनिल विचारे उपस्थित होते.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!