WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

सती विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव


सती विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव दिमाखात साजरा

 

चिपळूण – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मैदानी खेळ खूप महत्त्वाचे आहे.  खेळामुळे संघ भावना आणि व्यक्तिमत्त्व विकास होतो. शिवाय  विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा, जास्तीत जास्त विद्यार्थी क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी व्हावेत. यासाठी सह्याद्री शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी चिंचघरी सती विद्यालयात 5  ते 6 डिसेंबर दरम्यान वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला.
क्रीडा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी चिंचघरी सरपंच सौ. अनिता गुरव यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकावला तर उपसरपंच सौ. दीक्षिता चाळके यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित केली. शालेय समिती सदस्य राजाभाऊ चाळके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. क्रीडा स्पर्धेच्या कालावधीत सर्व नियमांची अंमलबजावणी करण्या संदर्भातील शपथ क्रीडामंत्री  श्रमिका शिंदे हिने सर्व विद्यार्थ्यांना दिली.  क्रीडा शिक्षक महेश सावंत यांनी खेळाचे महत्व व क्रीडा स्पर्धेचा मुख्य हेतू सांगितला. दोन दिवस चाललेल्या  या क्रीडा स्पर्धेत सांघिक खेळ लहान व मोठा गट मुले, मुली कब्बडी या खेळाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत कब्बडी मोठा गट मुलगे इ 10 वी ब विजयी व 9 वी फ उपविजयी, लहान गट कब्बड्डी मुलगे 7 वी ड विजयी व 7 वी ब उपविजयी, तसेच कब्बडी लहान गट मुली 7 वी ब विजयी व 7वी ड उपविजयी मोठा गट मुली इ.9 वी अ विजयी इ 8 वी इ/फ उपविजयी संघ झाले. या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचे नियोजन मुख्याध्यापक  संजय वरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक महेश सावंत यांनी केले. यावेळी उपमुख्याध्यापिका सौ. सुलोचना जगताप यांच्यासह विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व विद्यार्थी उपस्थित होते.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!