WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

वाढदिवसाचा खर्च टाळून शाळेत दंत तपासणी शिबिर


वाढदिवसाचा खर्च टाळून शाळेत दंत तपासणी शिबिर

घाणेखुंट येथील जय भवानी मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम

चिपळूण – जय भवानी मित्र मंडळ घाणेखुंट चे सदस्य आणि रोटरॅक्ट रत्नागिरी झोन अध्यक्ष तुषार खताते यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त जय भवानी मित्र माध्यमातून तसेच योगिता दंत महाविद्यालय खेड यांच्या मदतीने आदर्श शाळा घाणेखुंट नं ०२ आणि उर्दू शाळा घाणेखुंट येथे विद्यार्थांची मोफत दंत तपासणी शिबिर घेण्यात आले.
जय भवानी मित्र मंडळाचे सर्व सदस्य गेल्या काही वर्षापासून वाढदिवस साजरा न करता त्या खर्चातून गावातील शाळांमध्ये “एक वाढदिवस शाळेसाठी “ या उपक्रमांतर्गत शाळेच्या विद्यार्थ्यांना विविध शाळेउपयोगी साहित्य वाटप तसेच शाळेच्या प्रगतीसाठी आवश्यक भौतिक सुविधा निर्माण करत आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी विविध आरोग्य तपासणी वेळोवेळी राबविण्यात येतात. यावेळी मंडळाचे सदस्य तुषार खताते यांनी देखील आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांसाठी मोफत दंत तपासणी शिबीर आयोजित केले होते. या शिबिरामध्ये योगिता दंत महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना दातांची काळजी कशी घ्यावी, कोणते पदार्थ खावेत, कोणते पदार्थ खाऊ नयेत याचे मार्गदर्शन केले. ज्या विद्यार्थ्यांना दातांच्या समस्या आहेत त्यांना पुढील उपचारांसाठी महाविद्यालयात येण्यासाठी कार्ड देण्यात आले. विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना मोफत टूथब्रश आणि टूथपेस्ट चे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक श्री तांबे यांनी तुषार खताते यांचे तसेच जय भवानी मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांचे आभार मानले. यावेळी सरपंच राजू ठसाळे, रोटरॅक्ट क्लब लोटेचे अध्यक्ष शुभम काते, जय भवानी मित्र मंडळ अध्यक्ष अनिकेत काते, विक्रम पवार आदी उपस्थित होते

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!