WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

समृद्धी पाटीलचे कंपनी सेक्रेटरी परीक्षेत यश!


समृद्धी पाटीलचे कंपनी सेक्रेटरी परीक्षेत यश!

चिपळूण : शहरातील ॲड. संजय पाटील व ॲड. स्नेहल पाटील यांची कन्या समृद्धी हिने ‘कंपनी सेक्रेटरी'(सी.एस.) परीक्षेत यश संपादन केले आहे.

देशातील कठीण परीक्षांपैकी असणाऱ्या ‘ सीएस’ म्हणजे ‘कंपनी सेक्रेटरीज’ (Company Secretery) परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला. या परीक्षेचा निकाल ‘सीए’परीक्षे सारखा अवघड असतो. ‘सीएस’ परीक्षेत समृद्धी पहिल्याच प्रयत्ना मध्ये यश संपादन केले आहे. या यशामध्ये समृद्धीने आई वडिलांचे, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि अथक परिश्रम यामुळे ती हे यश प्राप्त करू शकली असे सांगितले.

या यशाबद्दल समृद्धी म्हणते, माझ्या कुटुंबाचा भक्कम पाठिंबा होता, म्हणून मी ही परीक्षा देऊ शकले. यामध्ये माझ्या शिक्षकांचाही मोठा वाटा आहे. यासाठी मी दररोज दहा ते बारा तास अभ्यास करत होते. अभ्यास करताना सातत्य आणि स्वतःचे नोट्स काढणे यावर मी भर दिला. त्यासाठी खूप मेहनत करावी लागली. सीएस म्हणून काम करताना कायद्याचा देखील अभ्यास असावा लागतो. यासाठी आई वडिलांकडून प्रेरणा घेतली होती. आई व वडील दोघेही वकील आहेत. मी CS चा अभ्यास करत करत माझे ‘लॉ’ चा देखील अभ्यास करून तीनही वर्षात डिस्टिंक्शन मिळवून आता चौथ्या वर्षात अभ्यास करत आहे.

कंपनी सेक्रेटरीज कोर्स नंतर कंपन्या मध्ये मोठ्या हुद्यावर काम करण्याची संधी मिळते. समृद्धी हिने काही काळ अनुभव घेऊन पुणे सारख्या शहरात स्वतःचे ऑफिस सुरू करण्याचा मानस बोलून दाखवला.

समृध्दीने तिच्या मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आज हे यश मिळवले आहे.तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!