WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

रूपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा


रूपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा

मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

चाकणकर यांनी आपला राजीनामा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. “मी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. तो स्वीकारावा,” अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रातून केली आहे.

दरम्यान, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे रूपाली चाकणकर या गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. या प्रकरणावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना लक्ष्य केले होते. तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामाही दिल्याने खळबळ उडाली असून महिला आघाडीच्या नेतृत्वात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!