WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

ब्राह्मण सहाय्यक संघात श्री गजानन विजय ग्रंथाचे वाचन


ब्राह्मण सहाय्यक संघात श्री गजानन विजय ग्रंथाचे वाचन

चिपळूण : चिपळूणच्या ब्राह्मण सहाय्यक संघात श्री गजानन महाराज (शेगाव) यांच्या श्री गजानन विजय ग्रंथाचे संपूर्ण वाचन गुरुवार दि‌नांक 19 फेब्रुवारी रोजी संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे संचालन श्री गजानन भक्त ह.भ.प. श्री. शरद बुवा तांबे यांनी केले. सकाळी 7 वा. श्री महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पारायणाला सुरुवात झाली. पारायण करण्यासाठी सुमारे 30 भक्तांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघाचे सचिन चितळे आणि संघाच्या संचालकानी सहभाग घेतला.

या कार्यक्रमासाठी भक्त श्री. तोडकरी, श्री. व सौ. चौघुले, श्री. पुष्कर आणि सौ. स्मीता काणे, ऋषी बापट यांनी विशेष सहकार्य केले.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!