WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

गुहागरच्या प्राध्यापकाचे जागतिक ऊर्जा क्षेत्राला दिशा देणारे संशोधन


गुहागरच्या प्राध्यापकाचे जागतिक ऊर्जा क्षेत्राला दिशा देणारे संशोधन

 डॉ. सतीश घोरपडे यांना पीएच.डी. प्रदान

गुहागर : विद्या प्रसारक मंडळाच्या महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. सतीश नंदकुमार घोरपडे यांनी नुकतीच आपली पीएच.डी. पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रा. घोरपडे यांनी “Integration of Parabolic Trough Collectors with Existing Coal Based Thermal Power Plant ” या विषयावर संशोधन पूर्ण केले. हे संशोधन विशेषतः 1200 मेगावॅट क्षमतेच्या JSW Energy च्या वीज प्रकल्पाच्या संदर्भात करण्यात आले आहे. या संशोधनाद्वारे पारंपरिक कोळशावर आधारित ऊर्जानिर्मितीमध्ये सौर ऊर्जेचा वापर करून कोळसा वापर कमी करणे आणि कार्बन उत्सर्जनात घट घडवून आणणे यावर भर देण्यात आला आहे.

या संशोधन कार्यासाठी JSW Energy कंपनीचे सहकार्य लाभले असून त्याबद्दल प्रा. घोरपडे यांनी आभार व्यक्त केले आहेत तसेच या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या आई वडिलांना दिले.

प्रा. डॉ. सतीश घोरपडे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

त्यांच्या या संशोधनामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!