WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

पोफळी येथे हजरत पीर आकूसखा बाबा यांचा ४ फेब्रुवारी रोजी उरूस


पोफळी येथे हजरत पीर आकूसखा बाबा यांचा ४ फेब्रुवारी रोजी उरूस

कव्वालीचा जंगी मुकाबला

शिरगाव : चिपळूण तालुक्यातील पोफळी येथील कोकणात प्रसिद्ध असलेल्या हजरत पीर आकूसखा बाबा उर्फ सिकंदर अलीशाह यांचा वार्षिक उरूस ४ फेब्रुवारी रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. यंदा शबे मेराज बडी रात्र असल्यामुळे उरूस कार्यक्रम तीन दिवस चालणार असल्याची माहिती उरूस कमिटी पोफळी सय्यदवाडी आकूसखानगर यांनी दिली.

हजरत पीर आकूसखा बाबा यांच्या दर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. नवसाला पावणारे बाबा म्हणून त्यांची ओळख असून, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणूनही या दर्ग्याचे विशेष महत्त्व आहे. उरूस निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार सोमवार २ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता सुन्नी जामा मशीद येथून संदल शरीफ निघणार आहे. मुख्य उरूस कार्यक्रम ४ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे.

या उरूसाचे खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध कव्वाल अदनान नाजा आणि इंतेजार चिश्ती यांच्यात होणारा कव्वालीचा जंगी मुकाबला. या भव्य कव्वाली कार्यक्रमासाठी भाविक आणि संगीतप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. उरूस कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उरूस कमिटी पोफळी सय्यदवाडी आकूसखानगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!