WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

परशुराम रूग्णालयात स्तन कर्करोग तपासणीसाठी आधूनिक यंत्रणा


परशुराम रूग्णालयात स्तन कर्करोग तपासणीसाठी आधूनिक यंत्रणा

गावा-गावात मोफत तपासणी शिबीरांचे आयोजन

चिपळूण, ता. २३ ः एम. इ. एस. ए. एम परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घाणेखुंट लोटे व अमनोरा येस फाउंडेशनसिटी ग्रुप, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने परशुराम रूग्णालयात स्तन कर्करोग तपासणीसाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात आली आहे. रूग्णालयात झालेल्या कार्यक्रमात 100 महिलांची मोफत तपासणी करण्यात आली. महिलांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी परिसरातील गावा-गावमध्ये शिबीरांचे आयोजन करून मोफत स्तन कर्करोग तपासणी केली जाणार असल्याची माहिती रूग्णालयाच्या प्रशासनाकडून देण्यात आली.
महिलांमधील स्तनांच्या कर्करोग प्रकर्षाने जाणवत आहे. वेळीच त्याची तपासणी होऊन उपचार व्हावेत, कोकणातील रूग्णांना य्चा दिलासा मिळावा, हा हेतूने परशुराम रूग्णालयात ही अत्याधूनिक यंत्रणा उभारण्यात आली आहे. महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी अत्याधुनिक असलेल्या iBreastexam मशीनचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. प्राचार्य डॉ. सचिन उत्पात, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनुपम अलमान, स्त्री रोग विभाग प्रमुख डॉ. दिप्ती चव्हाण, पंचकर्म विभाग प्रमुख डॉ. वृषाली स्वामी, पी. आर. ओ सुष्मिता पाटील यांच्यासह रुग्णालय प्रशासन, वैद्यकीय अधिकारी, यू ई लाईफ सायन्सेस कंपनीचे प्रतिनिधी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गंधाली देसाई व नीरजा साळेकर यांनी रुग्णालयातील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व तांत्रिक कर्मचाऱ्यांना सविस्तर प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणात मशीनची कार्यपद्धती, तपासणीची अचूक प्रक्रिया, रुग्ण समुपदेशन व अहवाल प्रणाली याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमात सुमारे १०० महिलांची मशीनद्वारे तपासणी करण्यात आली. महिलांमध्ये स्तन कर्करोगाबाबत जागरूकता वाढविणे आणि प्रारंभिक अवस्थेत निदान करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. परशुराम हॉस्पीटल आणि संशोधन केंद्र अमनोरा येस फाउंडेशन सोबत अत्याधुनिक तंत्रज्ञान, रोगाचे निदान, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि जनजागृती मोहिमेतून महिलांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी सातत्याने कार्यरत आहे. ग्रामिण भागातील महिलांमध्ये आरोग्य विषयक जागरूकता निर्माण होण्यासाठी गावोगावी वाडी वस्तीवर मोफत आरोग्य तपासणी शिबीरे घेतली जाणार आहेत. या शिबीरातून मोफत कर्करोग तपासणी केली जाणार आहे. परशुराम रूग्णालयात हे मशीन आता नेहमीच उपलब्ध असणार असून महिला याचा लाभ घेऊ शकतात. महिलांनी नियमित तपासणी करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन रूग्णालयाकडून करण्यात आले.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!