WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांना आमदार भास्कर जाधव यांचे आवाहन


आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांना आमदार भास्कर जाधव यांचे आवाहन

रत्नागिरी : इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धामुळे आखाती देशात वास्तव्याला असलेल्या आणि अडकलेल्या आपल्या राज्यातील, विशेष करून कोकणातील नागरिकांना शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी आवाहन करत धीर दिला आहे.

आ. भास्कर जाधव म्हणाले की, आखाती देशांमध्ये असलेल्या माझ्या हिंदू- मुस्लिम बांधवांना, भगिनींना मी एक आवाहन करतो की सध्या इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल या देशांनी युद्ध पुकारलेले आहे. आणि त्याचा नाही म्हटले तरी त्रास हा संपूर्णपणे आखाती देशातल्या नागरिकांना बसणारच आहे. परंतु आपल्या सर्वांचा एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांना एक दिलासा देतो. आपल्या सर्वांना एक खात्री देतो. आपल्या देशात विविध देशाचे जे अम्बेसडर आहेत. दूतावास आहेत त्या दूतावासामध्ये आम्ही मंडळी संपर्क साधून आहोत. त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी त्या सर्व बांधवांशी फोनवर बोलणं होतंय, मोबाईलवर बोलणं होतंय. मी बोलण्याचा प्रयत्न करतोय.

मी आखाती देशामध्ये असलेल्या आमच्या सर्व बांधवांना, भगिनींना त्याचबरोबर आपल्या भारत देशामध्ये असलेल्या
आणि विशेष करून कोकणामध्ये असलेल्या बंधू-भगिनींना मी या ठिकाणी दिलासा देतो की आपण घाबरून जाण्याचं कारण नाही. आपण चिंता करण्याचं कारण नाही. आपण सर्वांनी निश्चिंत रहा, निर्दस्त रहा, आणि कधीही कुठलीही काहीही अडचण आली तरीसुद्धा माझ्या 9422429911 या मोबाईल नंबरवर आपण सर्वांनी मला कधीही संपर्क करू शकता.

मी आपल्या सर्वांच्या मदती करता कायम तत्पर आहे.
चिंता करू नका. एवढंच फक्त मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे.
धन्यवाद.

 


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!