WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

राज्यात शासकीय सुट्टी जाहीर, तीन दिवसांचा दुखवटा


राज्यात शासकीय सुट्टी जाहीर, तीन दिवसांचा दुखवटा

मुंबई : बुधवारी सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. राज्यातील या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज बुधवारी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच राज्यात तीन दिवसांचा वेतनासह दुखवटा पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या दुखवट्याच्या कालावधीत सर्व शासकीय कार्यालये, शासकीय व निमशासकीय आस्थापना तसेच सार्वजनिक कार्यक्रम रद्द ठेवण्यात येणार आहेत. शासकीय ध्वज अर्ध्यावर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून कोणतेही उत्सव, समारंभ किंवा आनंदोत्सव साजरे न करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

राज्यभरात शोककळा पसरली असून नागरिकांनी शांतता राखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पुढील आदेश व निर्देश शासनाकडून वेळोवेळी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!