WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

शासकीय योजना लोकापर्यंत पोहोचण्यासाठी अधिकाऱ्यांना बळ देणार – सौ. पुजाताई निकम


शासकीय योजना लोकापर्यंत पोहोचण्यासाठी अधिकाऱ्यांना बळ देणार – सौ. पुजाताई निकम

कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय चिपळूण तर्फे महिलांचा गौरव

चिपळूण – तालूक्यातील नागरीकांना शासन स्तरावर विविध योजना व उपकम सुरु आहेत. कामगार हा केंद्रबिंदू ठेऊन त्यांच्यासाठी मंडळाकडून सुरु असलेले उपकम व योजना कामगारांना आर्थिक दिलासा देण्याबरोबर विशेष सन्मान मिळवून देतात, ही अभिमानास्पद बाब आहे. लोकप्रतिनिधी म्हणून मंडळाच्या कल्याणकारी कार्यास नेहमीच सहकार्याची आणी पुढाकाराची जबाबदारी घेऊ, असे प्रतिपादन सावर्डे गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. पुजाताई निकम यांनी केले .
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय चिपळूण अंतर्गत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला. शेकडो महिलांच्या सहभागात परशुराम हाँस्पीटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तर चिपळूण तालुका आजी माजी सैनिक सहकारी पतसंस्था यांच्या वतीने आरोग्यदायी भेट वस्तुंचे वाटप करण्यात आले. मंडळाच्या वतीने कामगार व कामगार कुटूंबीय कर्तुत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांचे प्रतिमापुजन करून झाले .
चिपळूण नगरपरीषदेच्या उपनगराध्यक्षा रुपाली दांडेकर यांनी नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या कामगार पाल्य महिलांचे बचत गट अधिक सक्षम करण्यासाठी मंडळाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांचा निश्चितच फायदा होईल आणी त्याकरीता नगरपरीषद चिपळूण कामगार कल्याण मंडळास आवश्यक ती मदत करेल असे आवाहन केले.
कौटुंबिक जबाबदारीमध्ये महिलांचे महत्व अधोरेखित करत काल आणी आज यामध्ये महिलांनी केलेली विविध क्षेत्रातील प्रगती याचे दाखले देत महिलांची सुरक्षितता आणी सन्मान यासाठी बांधिल असल्याचे प्रतिवादन चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शामल कदम यांनी परिवर्तन या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून उभी केलेली बचत गटाची चळवळ आणी त्यातून महिलांनी पुढे जाण्यासाठी काय करावे याकरीता उपयुक्त मार्गदर्शन केले. सत्कारार्थी महिलांमध्ये तृप्ती हिरवे जे के तालाबोट – सुषमा करंदीकर चिपळूण एसटी आगार सुवर्णा पाटील युपसव्ही छाया पोटे महाजनको रसिका काजारी जे के फाईल्स संजिवनी मोरे पी अँन्ड पी कॉन्ट्रॅक्टर्स प्राजक्ता टकले व रेखा भुवड हिन्दुस्थान युनिलिव्हर यांची त्यांनी दिलेले सामाजिक योगदान व प्राप्त केलेले विशेष कौशल्य या आधारावर सन्मान करण्यात आला.
यावेळी गुणवंत कामगार नितीन कदम व संजय सुर्वे दैनिक सकाळचे मुझफ्फर खान, पाडुरंग साळवी तर परशुराम हॉस्पीटलच्या सौ. सुस्मिता पाटील आणी सहकारी वर्षा भेलसईकर, चिपळूण तालुका आजी – माजी सैनिक सहकारी पतसंस्था आदी मान्यवर उपस्थित होते .
प्रास्ताविक प्रभारी कामगार कल्याण अधिकारी राजेंद्र निकम, निवेदन जयश्री यादव व आभार प्रदर्शन ज्योती गाडे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन संस्कृती शिंदे, स्नेहा चव्हाण, ऋतुजा जोर्वेकर, अक्षता जोशी, स्मिता शिदे व नम्रता खेडेकर यांनी केले.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!