WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांना बेड्या


ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांना बेड्या

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

११ लाख ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त

गुहागर : रत्नागिरी जिल्ह्यातील घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठे यश मिळाले आहे. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठ येथील ओंकार ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ११ लाख ९५ हजार २०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी जिल्ह्यातील घरफोडी, चोरीसारख्या गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले होते. त्यानुसार या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. दरम्यान, दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे १.३१ वाजता अज्ञात इसमांनी गुहागर पोलीस ठाणे हद्दीतील शृंगारतळी बाजारपेठ येथील ओंकार ज्वेलर्स दुकानाचे बाहेरील शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला व आतील शटर तोडण्याचा प्रयत्न केला. या घटनेप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक ११/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३३१(६), ३३१(४) व ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहिती यांच्या आधारे चार आरोपींचा शोध लावला. त्यानुसार खालील आरोपींना पंतनगर, घाटकोपर (मुंबई) येथून ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतलेले आरोपी :
निशांत सुधीर आंबोकर (रा. बीएसटी कॉलनी, पंतनगर, घाटकोपर, मुंबई)

मोईन शकील शेख (रा. गोपाल भवन, घाटकोपर, मुंबई)

सुमित कुलदीप चुनियाना (रा. कोहिनूर सिटी, कुर्ला, मुंबई)

आयुष जितेंद्र घागडा (रा. तानसा पाईपलाईन, लक्ष्मण नगर, घाटकोपर, मुंबई)

आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले एक चारचाकी वाहन तसेच इतर साहित्य असा एकूण ₹११,९५,२०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुहागर पोलीस ठाणे करत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी :
श्रे. पो. उपनिरीक्षक संदीप ओगले
पो. हवालदार विजय आंबेकर
पो. हवालदार गणेश सावंत
पो. हवालदार दीपराज पाटील
पो. हवालदार योगेश नार्वेकर
चालक पोलीस हवालदार अतुल कांबळे यांचा समावेश आहे.

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!