WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भव्य प्रवेश


महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भव्य प्रवेश

आमदार शेखर निकम यांच्या विकासकामांवर विश्वास व्यक्त

चिपळूण : शहरातील विविध भागांतील महिलांनी आमदार शेखर निकम यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर ठाम विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. या भव्य प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले असून राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली आहे.

माजी सभापती पूजाताई निकम यांनी संपर्क कार्यालयात नवप्रवेशितांचे मनापासून स्वागत केले. यावेळी त्यांनी महिलांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी तसेच विकासात्मक कामांना गती देण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू, असा विश्वास व्यक्त केला. या प्रवेशामुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होण्यास निश्चितच मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

या प्रवेशासाठी डॉक्टर रहिमत जबले यांनी विशेष प्रयत्न केले. शहर महिला अध्यक्षा आदिती देशपांडे यांनी सर्व महिलांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी मनीषा जोगले, नेत्रा जोगले, दीप्ती भुवड, सेजल जोगले, ममता शेडगे, अनिता गुढेकर, शुभांगी घाडगे, सुहासिनी शेडगे, अकीला शहा, फरहाना शेख, रईसा कास्कर, रिजवाना सय्यद, फातिमा झारे, रुबिना कास्कर, चंद्रभागा घडशी, प्रांजली शीतप, नम्रता भुवड या महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला.

कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य पूजाताई निकम, नगरसेविका शहनाज वांगडे, महिला प्रदेश प्रतिनिधी दिशा दाभोळकर, जागृतीताई शिंदे, आदिती देशपांडे, रवीना गुजर, मनाली जाधव, पुनम भोजने, रहिमत जबले, मीरा नारकर, निहालिका तांबडे आणि बोन्द्रे आदी उपस्थित होते.

या प्रवेशावेळी महिलांनी व्यक्त केले की, हा केवळ राजकीय बदल नसून विकासाच्या दिशेने उचललेले ठोस पाऊल आहे. आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून झालेला विकास उल्लेखनीय असून त्यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!