WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

आमदार भास्करराव जाधव मांडणार संसदेत नाकारलेल्या विधेयकांमागील वास्तव


आमदार भास्करराव जाधव मांडणार संसदेत नाकारलेल्या विधेयकांमागील वास्तव

गुरुवारी सर्वपक्षीयांसह पत्रकार परिषद

चिपळूण : संसदेत मांडलेल्या आणि नामंजूर झालेल्या महिला आरक्षणासह इतर विधेयकांमागील वास्तव यावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, आमदार श्री.भास्करराव जाधव यांनी गुरूवार, दि. २३ एप्रिल २०२६, सकाळी ११ वा. शिक्षक पतपेढी हॉल, प्रांत ऑफिसच्या मागे येथे होणार आहे. चिपळूण येथे पत्रकार परिषद आयोजित केली असून यावेळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच विविध सामाजिक, व्यवसायिक संस्था तसेच संघटनांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या संसदेमध्ये दि. १६ ते १८ एप्रिल २०२६ यादरम्यान झालेल्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण कायदयात दुरूस्ती करण्यासंबंधीचे १३१ वे घटनादुरूस्ती विधेयक तसेच सीमांकन विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदे (सुधारणा) अशी तीन विधेयके मांडण्यात आली. मात्र दोन दिवसांच्या चर्चेअंती तिन्ही विधेयके नाकारली गेली. आपण सर्वजण या देशाचे नागरिक आहोत आणि महिला आरक्षणासह अत्यंत महत्वाच्या विषयासंबंधी मांडलेली विधेयके नाकारली गेली, त्यामागची वस्तुस्थिती काय? हे जाणून घेण्याचा आपला अधिकार आहे. त्यामुळेच राष्ट्राचं ऐक्य, संविधानाने दिलेले अधिकार आणि नाकारली गेलेली विधेयके यासंदर्भात आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.

देशाच्या हिताच्यादृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या या विषयावरील पत्रकार परिषदेला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध सामाजिक, व्यवसायिक संस्था तसेच संघटनांचे प्रतिनिधी यांनी देशाचे एक नागरिक या नात्याने उपस्थित राहून पत्रकारांबरोबर या चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!