WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

श्री देवी करंजेश्वरीच्या सुवर्ण मुखवट्याचे उद्या आगमन


श्री देवी करंजेश्वरीच्या सुवर्ण मुखवट्याचे आज आगमन 

चिपळुणातून निघणार भव्य शोभायात्रा

चिपळूण : गोवळकोट–पेठमाप येथील श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थान संस्था यांच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या सुवर्ण (मुखवटा) रूपे संकल्पाची यशस्वी पूर्तता झाली आहे. देवीच्या असंख्य भक्तांनी दान केलेल्या सोन्यातून श्री देवी करंजेश्वरीच्या सुवर्ण मुखवटा घडविण्यात आला असून त्याचे आगमन आज रविवार दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. या पवित्र आणि ऐतिहासिक क्षणाचे स्वागत भव्य व भक्तिमय शोभायात्रेद्वारे करण्यात येणार आहे.

कोकणात शेरणे काढण्याच्या कार्यक्रमामुळे प्रसिद्ध असलेला गोवळकोट–पेठमाप येथील श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानचा शिमगोत्सव यावर्षी दिनांक 28 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान साजरा होत आहे. हा उत्साह दारात असतानाच श्री देवी करंजेश्वरीच्या सुवर्ण मुखवट्याचे आगमन होत असल्याने भक्तगणांसाठी हा ‘सुवर्ण योग’ जुळून आला आहे. रविवारी दुपारी ३ वाजता शोभायात्रेला प्रारंभ होणार असून, या सोहळ्यामुळे परिसरात उत्सवी व धार्मिक वातावरण निर्माण होणार आहे. सुवर्ण मुखवट्याच्या आगमनाने भक्तांच्या भावना अधिक दृढ होऊन देवस्थान परिसरात भक्तिरसाची उधळण होणार असल्याचे देवस्थान संस्थेकडून सांगण्यात आले.

या शोभायात्रेत गोवळकोट, पेठमाप तसेच मजरेकाशी येथील ग्रामस्थ, महिला, युवक-युवती यांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व ग्रामस्थांनी दुपारी ३ वाजता जुने कालभैरव मंदिर, चिपळूण येथे एकत्र जमावे, असे आवाहन श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थान, गोवळकोट, पेठमापचे अध्यक्ष ऍड. प्रसाद चिपळूणकर यांनी केले आहे.

सुवर्ण मुखवट्याच्या आगमनामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार असून, हा सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!