WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

सुमारे दीड लाखांचा हार चोरीस ; महिलेवर गुन्हा


सुमारे दीड लाखांचा हार चोरीस ; महिलेवर गुन्हा

चिपळूण : शहरातील खेंड महालक्ष्मीनगर येथील एका घरातून एका महिलेने सुमारे दीड लाख रुपये किंमतीचा सोन्याचा हार चोरल्याची घटना दिनांक 1 डिसेंबर 2025 ते दिनांक 4 जानेवारी 2026 या कालवधीत घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिल्पा निरंजन दुर्गे (30, कौढरताम्हाने) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबतची फिर्याद मधुबाला श्रीराम दुर्गे (57, खेंड, महालक्ष्मीनगर) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खेंड महालक्ष्मीनगर येथे मधुबाला दुर्गे यांच्या घरातील कपाटात ठेवलेला 1 लाख 44 हजार किंमतीचा 24.44 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार शिल्पा दुर्गेने चोरून नेला. हा प्रकार मधुबाला दुर्गे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिल्पा दुर्गेवर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!