WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

संस्था चालकांचा सत्कार हा त्या संस्थेला उभारी देणाऱ्यांचा सन्मानच : सुभाषराव चव्हाण


संस्था चालकांचा सत्कार हा त्या संस्थेला उभारी देणाऱ्यांचा सन्मानच : सुभाषराव चव्हाण

भाजप चिपळूण शहर मंडलच्यावतीने सत्कार सोहळा संपन्न

चिपळूण : चिपळूण शहर भाजप मंडलाने घेतलेला संस्था चालकांचा सत्कार हा त्या संस्थेला उभारी देणाऱ्यांचा सन्मानच असून हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी केले.

दै.नवराष्ट्र यांच्या वतीने सुभाषराव चव्हाण यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि सीईओ सौ. स्वप्ना यादव यांना बेस्ट सीईओ म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा भाजप शहर मंडल यांच्यावतीने शनिवारी संपन्न झाला. भारतीय जनता पार्टी स्थापना दिन व माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री व खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना सुभाषराव चव्हाण बोलत होते.

भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, सीईओ सौ.स्वप्ना यादव, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश उर्फ बाबू तांबे, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, स्मिताताई चव्हाण, भाजप शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, परशुराम एज्युकेशन सोसायटीचे संचालक मकरंद जोशी, नॅबचे अध्यक्ष निलेश भूरण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री. चव्हाण पुढे म्हणाले, अनेक मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम करत असतात अशा मंडळींना समोर आणून त्यांचा गौरव करणे ही एक वेगळी परंपरा जोपासण्याचे काम शहर मंडल भाजप करीत आहे. जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि त्यांची संपूर्ण टीम उत्कृष्ट काम करीत आहेत ही सर्व एक कौटुंबिक मंडळी आहे त्यांनी माझा आज जो सत्कार केला त्यांचे आभार व्यक्त करतो.

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचा आज शहर मंडलाने सत्कार कार्यक्रम आयोजित केला आहे. या माध्यमातून सर्व मंडळींना भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल भारतीय जनता पार्टी पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त सर्वत्र कार्यकर्ते विविध प्रकारचे उपक्रम राबवित आहेत. कर्तुत्वानुसार त्या त्या व्यक्तींचा मान सन्मान ठेवण्याचे काम पक्ष सदैव करीत आला आहे. पुढील काळात देखील पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्यांचा अधिक जोमाने सन्मान केला जाईल. समाजात जनतेसाठी काम करणारे आजचे मान्यवर हे खरे सत्कारमूर्ती आहेत. भाजपाची विचारधारा पुढे नेण्याचे काम ही मंडळी करीत आहे. सत्कार करून पक्षाने या मंडळींचा आदरच केला आहे, असे भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले.

आपल्या पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन ठाकरे शिवसेनेचे जुने कार्यकर्ते शेखर लवेकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षातही त्यांचे उल्लेखनीय काम होते. भविष्यात त्यांना भाजपमध्ये सन्मानच मिळेल. जिथे जिथे आमची गरज भासेल तिथे आम्ही पूर्ण ताकतीने शेखर लवेकर यांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही देत ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते लवेकर यांचे प्रशांत यादव यांनी पक्षात स्वागत केले.

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, सीईओ सौ.स्वप्ना यादव, नव कोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, परशुराम एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मकरंद जोशी, चिपळूण अर्बन बँक संचालक रत्नदीप देवळेकर, परांजपे स्कूल चेअरमन प्रशांत देवळेकर, चिपळूण अर्बन बँक संचालक समीर टाकळे,
नवकोकण एज्युकेशन सोसायटी संचालक अतुल चितळे, प्राथमिक शिक्षक पतसंस्था संचालक अमोल भोबस्कर, नॅब आय हॉस्पिटलचे चेअरमन निलेश भुरण, नव कोकण एज्युकेशन सोसायटी संचालक महेंद्र कानडे, नवकोकण एज्युकेशन सोसायटी संचालक संजीव खरे, नवकोकण एज्युकेशन सोसायटी संचालक आशिष जोगळेकर, वैश्य वाणी पतसंस्था संचालक सागर गांधी, परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालक राजीव कानडे, संचालक तुषार गोखले, क्युबा ड्राईव्ह प्रशिक्षक समृद्धी देवळेकर, मास्टर इन जर्नालिझम पदवी घेतलेली ऋतुजा कदम, फिजियोथेपिस्ट इशा दांडेकर, नवकोकण एज्युकेशन संचालक सौ.धनश्री बापट , परशुराम एज्युकेशन संचालक मंजुषा चितळे, परशुराम एज्युकेशन संचालक सौ.सारीका भावे या मान्यवरांचा भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी मंगेश तांबे यांनीही हा सोहळा उत्तम आहे असे सांगितले तर ऋतुजा कदम हिनेही या सत्कार मुळे आम्हाला काम करण्यास उभारी मिळाली असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक शशिकांत मोदी यांनी केले. जिल्हा कोषाध्यक्ष आशिष खातू, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा परिषद सदस्य सौ. दिप्ती महाडिक, तालुकाध्यक्ष सौ.आदिती गुडेकर, नगरसेविका अंजली कदम, महिला मोर्चा अध्यक्ष रसिका देवळेकर, माजी नगरसेवक विजय चितळे, रामदास राणे, नगरसेविका शीतल रानडे, शहर उपाध्यक्ष निनाद आवटे, जतिन घटे, शहर कोशाध्यक्ष अश्विनी वरवडेकर, सौ.रुई खेडेकर, सौ.विमल लड्डा, सौ.सपना भिसे, सौ.मृणाल घटे, पुनम काजारी, भरत जाधव, महेश दीक्षित, अभिषेक राजापूरकर, कृणाल आंबेकर, प्रणय वाडकर,अनघा जोशी, सौ.प्राजक्ता टाकळे , निशा कोलगे, लीना फूटक, माधवी शिंदे, शिल्पा शिंदे या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. नगरसेविका राणी महाडिक, नगरसेविका नीलम जाधव, नगरसेवक अंकुश आवले, मनीषा पवार, सौ.वाजे सौ. कदम, विभावरी जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता पालकर, निखिल किल्लेकर यांनी केले तर अभय चितळे यांनी आभार मानले.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!