WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

चिपळूण येथे उद्या डॉ. आंबेडकर वाचनालयाच्या रौप्य महोत्सवी वर्ष सांगता समारोह


चिपळूण येथे उद्या डॉ. आंबेडकर वाचनालयाच्या रौप्य महोत्सवी वर्ष सांगता समारोह

चिपळूण : येथील नगर परिषद पुरस्कृत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या रौप्य महोत्सवी वर्ष सांगता समारोह उद्या (बुधवार) सायंकाळी बुरुमतळी येथील वाचनालय आवारात संपन्न होत आहे.

सायंकाळी ४.३० ते ६.३० वा. या वेळेत संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास चिपळूण-संगमेश्वर मतदार संघाचे आमदार शेखर निकम, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, माजी आमदार रमेश कदम, वाशिष्ठी उद्योग समूहाचे प्रवर्तक आणि भाजप दक्षिण चे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, ग्रंथालयाचे मार्गदर्शक प्रकाश देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत.

या समारोहास वाचनालयप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, कार्याध्यक्ष सुनिल खेडेकर, कार्यवाह सुमेध करमरकर यांनी केले आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!