WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

चिपळुणात डॉक्टरांचा “रंगतरंग” कार्यक्रमाचा जल्लोष


चिपळुणात डॉक्टरांचा “रंगतरंग” कार्यक्रमाचा जल्लोष

आयएमए चिपळूणचा रंगतदार सांस्कृतिक सोहळा उत्साहात

चिपळूण : इंडियन मेडिकल असोसिएशन चिपळूण शाखेच्या वतीने ३ मे रोजी शहरालगतच्या माटे सभागृहात “रंगतरंग” सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. आयएमए चिपळूणचे अध्यक्ष डॉ.अब्बास जबले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

सांस्कृतिक समितीच्या अध्यक्षा डॉ. अनुपमा जोशी आणि ऑर्गनायझिंग सेक्रेटरी डॉ.मुश्ताक मुकादम यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व सुरेख आयोजन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ इसाक खतीब उपस्थित होते. त्याचप्रमाणे दिनांक 25 एप्रिल रोजी रनिंग स्पर्धाचे आयोजन डॉ मनीषा वाघमारे डॉ तेजानांद गणपते डॉ अश्विनी गणपते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

कॅरम बुद्धिबळ बॅडमिंटन आणि टेबल टेनिस या क्रीडा स्पर्धांचे आयोजन डॉ समीर दळवी डॉ वनिता सानप आणि डॉ. अविनाश पवार यांनी उत्तमरित्या केले. रंगतरंग या सांस्कृतिक कार्यक्रमात लहान मुलांचे नृत्य, फनी गेम्स, सोलो सॉंग्स, एकांकिका, वाद्यसंगीत सादरीकरण अशा विविध कलाप्रकारांनी उपस्थितांची मने जिंकली. तसेच ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना वाहिलेली विशेष श्रद्धांजली हा कार्यक्रमाचा आकर्षणबिंदू ठरला.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ डॉक्टरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. डॉ. इसाक खतीब यांच्या हस्ते बक्षीस वितरण पार पडल. विविध मान्यवर डॉक्टर, त्यांचे कुटुंबीय आणि मुले मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते, ज्यामुळे कार्यक्रमाला एक कुटुंबवत्सल वातावरण लाभले. यावेळी २५, २६ आणि २७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या इनडोअर व आऊटडोअर क्रीडा स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. तसेच डॉ. मंझूर मणियार यांचे सुपुत्र डॉ. झाकी यांनी एमबीबीएस पदवी उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष डॉ. अब्बास जबले यांनी आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा सादर केला. या कालावधीत अवयवदान जनजागृती, नेत्रदान सायकल रॅली, महिलांसाठी स्तनपान व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन, आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरे, वॉकेथॉन अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच आयएमए सदस्यांसाठी १४ हून अधिक एमएमसी क्रेडिट पॉइंट्स मिळवून देणारे शैक्षणिक कार्यक्रम राबवण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरोग, संधिवात, हृदयरोग, कान-नाक-घसा, नेत्ररोग, छातीचे आजार, मधुमेह आणि शस्त्रक्रिया अशा विविध वैद्यकीय विषयांचा समावेश होता. यासोबतच इंडियन मेडिकल असोसिएशनची राज्य कार्यकारिणी बैठकही यशस्वीरीत्या पार पडल्याचे त्यांनी नमूद केले. एकूणच, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांना एकत्र आणत सामाजिक बांधिलकी आणि मनोरंजन यांचा सुंदर मेळ या कार्यक्रमातून साधण्यात आला. यानंतर डॉ. रेहमत जबले यांनी पु.ल. देशपांडे लिखित ‘ती फुलराणी’ मधील संवादाचे सादरीकरण करत सर्वांची मन जिंकली. त्याला त्यांनी अभिनयाची जोड दिल्याने जोरदार टाळ्यांच्या गजरात दाद देम्यात आली.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!