WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

चिपळुणात २१ जणांची माघार


चिपळुणात २१ जणांची माघार

➡️ जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट

➡️ उमरोली गटात बंडखोरी

चिपळूण : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी एकत्रीत ११६ पैकी २१ उमेदवारांनी मंगळवारी माघार घेतली. यात जिल्हा परिषदेच्या ६ तर पंचायत समितीच्या ११ उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे उमरोली जिल्हा परिषद गटात बंडखोरी कायम राहिली असून येथील लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.

श्री.संदेश संजय मोहिते
पं. स. गण -35 खेर्डी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

श्री.किशोर भालचंद्र घाग
जि. प. गट -24 कोकरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या ९ गटात ४४ उमेदवारांनी तर पंचायत समितीच्या १८ गणात ७२ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या शिरगांव गटातून राधीका नयनेश नारकर, उमरोली गटातून अजित सदाशिव थरवळ व नंदकुमार रामचंद्र थरवळ, वहाळ गटातून आर्या विठ्ठल जाधव, कोकरे गटातून पुनम संतोष चव्हाण व किशोर भालचंद्र घाग या सहा जणांनी माघार घेतली. तर पंचायत समितीच्या कळवंडे गणातून सारिका सागर चिले, पेढे गणातून रोशन सुनिल आंब्रे, खेर्डीतून संदेश संजय मोहिते, अलोरेतून प्रविण गंगाराम पेंढारे, पिंपळी खुर्द मधून पुजा प्रकाश पालकर व जयश्री विश्वनाथ सकपाळ, वेहेळे मधून संजय सिताराम जाबरे, शिरगांव मधून साक्षी अजित लाड, मांडकी मधून प्रमोद प्रभाकर खेडेकर, निवळीतून स्नेहश्री सुरेंद्र सुर्वे, वहाळ मधून सुमित सुरेश पाध्ये, शशिकांत संतोष घेवडे व प्रितेश तुकाराम जावळे आणि कोकरे गणातून नारायणी निलेश खापरे व पुनम संतोष चव्हाण आदींनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. या निवडणूकीत वहाळ, कोकरे, पेढे, खेर्डी, मांडकी आणि उमरोली गटात बंडखोरी झाली होती. अपक्षाचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी संबंधीत उमेदवार व नेत्यांचा खटाटोप सुरू होता. अखेरच्या दिवशी त्याला यश आल्याचे दिसून आले. मात्र युतीत उमरोली गटात बंडखोरी कायम राहिली आहे.

जिल्हा परिषद गटासाठी रिंगणात असलेले उमेदवार
गटाचे नाव:

कळवंडे
गौतमी निलेश चव्हाण आदवडे ( राष्ट्रवादी कॉंग्रेस ), सामिया सलिम तांबे ( उद्धवसेना ), मयुरी मिलींद शिर्के ( शिंदेसेना), अॅड. गिता विकास जाधव ( वंचित बहूजन आघाडी)

पेढे
मानसी महेश भोसले ( उद्धवसेना ), दिप्ती दिपक महाडीक ( भाजप), सानवी स्वप्निल शिंदे (राष्ट्रवादी कॉंग्रेस )

खेर्डी
स्वरा निलेश जावळे ( उद्धवसेना ), दिशा दशरथ दाभोळकर ( राष्ट्रवादी कॉंग्रेस ), रावी सतीश मोरे (भाजप ).

अलोरे
गायत्री गणेश कदम ( राष्ट्रवादी कॉंग्रेस ), विनया विनोद झगडे ( शिंदेसेना )

शिरगांव
दिक्षा दत्ता कांबळी ( शिंदेसेना ), अमिता अरूण मोडक ( राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्ष ), नेहा सुरेश रहाटे ( राष्ट्रवादी कॉंग्रेस )

सावर्डे
ममता जयराम खांबे ( उद्धवसेना ), पुजा शेखर निकम ( राष्ट्रवादी कॉंग्रेस ), धनश्री रविंद्र शिंदे ( शिंदेसेना )

उमरोली
निलेश अनंत चव्हाण ( राष्ट्रवादी कॉंग्रेस ), प्रमोद सुरेश निवळकर ( उद्धवसेना ), योगेश चंद्रकांत शिर्के ( भाजप), योगेश यशवंत खांडेकर (अपक्ष)

वहाळ
पुर्वा सुभाष जाधव ( उद्धवसेना ), आदिती हरिश्चंद्र भागडे ( राष्ट्रवादी कॉंग्रेस ), शिवानी संदीप सावंत ( शिंदेसेना )

कोकरे
सिद्धार्थ ताराबाई लक्ष्मण कदम ( शिंदेसेना ), संजय राजाराम कदम ( राष्ट्रवादी कॉंग्रेस ), संतोष बंडाजी चव्हाण ( उद्धवसेना ), विलास भागोजी डिके (बसपा)


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!