WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

श्रीराम फायनान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी


श्रीराम फायनान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

चिपळूण : श्रीराम फायनान्स लिमिटेड यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरी करण्यात आली. कंपनीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदा शिवजयंती उत्सवाचे आठवे वर्ष असल्याने कार्यक्रमास विशेष उत्साह लाभला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व रूपरेषा सचिन मोहिते यांनी सादर केली. दीपप्रज्वलनाचा शुभारंभ यशवंत सोहनी, ॲड. अमित कदम, पराग वरवडेकर, विजय देशमुख व कुमारी श्रुतिका चाळके यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर जान्हवी मते, प्राची मिरगल-भोजने व काजल कांबळी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून औक्षण करण्यात आले.

यावेळी ॲड. अमित कदम, यशवंत सोहनी, जान्हवी मते, विजय देशमुख व काजल कांबळी यांनी महाराजांच्या जीवनकार्यावर व पराक्रमावर भाष्य केले. शिवाजी महाराजांचे शौर्य, स्वराज्य स्थापनेतील योगदान व आदर्श नेतृत्व यांचा गौरव करण्यात आला.

समारोपप्रसंगी सचिन मोहिते यांनी महाराजांच्या काळातील सामाजिक व राजकीय परिस्थितीचा उल्लेख करत सद्यस्थितीशी तुलना केली. त्या काळात काही सरदार स्वार्थासाठी गनिमांना मदत करीत असत, तर आजच्या काळात चुकीच्या गोष्टी घडताना काही लोक मौन बाळगतात किंवा पैशासाठी तडजोड करतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनुप चव्हाण, धम्मानंद सावंत, सुहास लोटेकर, प्रथमेश राणीम, साईराज कांबळी, साईकेत, अतुल मोहिते, अमोल कदम, नरेश मेस्त्री व श्रेयस पालकर , जीवन कांबळी, राहुल ठाकरे, संदीप कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!