WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

क्रिकेट खेळण्यासाठी जाताना खेळाडूंचा अपघात


क्रिकेट खेळण्यासाठी जाताना खेळाडूंचा अपघात

भोम येथील घटना, एस.टी चालकावर गुन्हा

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील भोम वरचीवाडी येथील वळणावर शुक्रवारी, १७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ ते २.१५ वाजण्याच्या सुमारास एस.टी. बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दोन युवक जखमी झाले.


या अपघाताप्रकरणी मंदार रामदास भुवड (वय २०, व्यवसाय शेती, रा. भिले जोशीवाडी, ता. चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी व त्याचे मित्र गजानन सुरेश मोरे (वय २४) आणि शौर्य अजित कदम (वय १७, दोघेही राहणार कापरे)हे तिघे हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (एम.एच.०८ वाय १९८६) या दुचाकीवरून रामपूर येथे क्रिकेट खेळण्यासाठी जात होते. भोम वरचीवाडी येथील वळणावर समोरून येणाऱ्या एस.टी. बस क्र. एम.एच.२० बी.एल. ३५८० च्या चालकाने, रस्ता वळणाचा असतानाही निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात तिघेही युवक जखमी झाले.

या प्रकरणी एस.टी. चालक पांडुरंग अशोक पवार (वय ३५, रा. पळशी, ता. माण, जि. सातारा; सध्या चिपळूण) याच्याविरोधात गु.र.न. २१/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब) व मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!