WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

चिपळुणात घरफोडी ; ४९ हजारांच्या रोकडसह दोन तोळ्याचा सोन्याचा हार चोरीस


चिपळुणात घरफोडी ; ४९ हजारांच्या रोकडसह दोन तोळ्याचा सोन्याचा हार चोरीस

चिपळूण : शहरातील खेंड परिसरातील संसारेवाडी येथे घरफोडीची घटना उघडकीस आली असून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज अज्ञाताने लंपास केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी एका संशयित तरुणाविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुहास जयंत कासार (वय २८, रा. खेंड कांगणेवाडी, चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद भूषण संदेश संसारे (वय ३६, रा. खेंड संसारेवाडी, चिपळूण) यांनी दिली आहे.

फिर्यादी भूषण संसारे यांचे कुटुंबीय बाहेरगावी फिरायला गेले असताना घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत संशयिताने घराच्या खिडकीतून आत प्रवेश करून चोरी केल्याचे उघड झाले आहे. घरातील कपाटातून ४९ हजार रुपयांची रोकड तसेच सुमारे ३ लाख रुपये किमतीचा दोन तोळे वजनाचा सोन्याचा हार असा एकूण ३ लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे.

या घटनेप्रकरणी भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम ३०५ (क) व ३३१ (४) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!