WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

दोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच फटके


दोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच फटके

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणालाच मारहाण

चिपळूण :शहरातील बहादूरशेखनाका येथे किरकोळ कारणावरून झालेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरूणालाच मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ७.४५ वाजता घडली. यामध्ये संबंधीत तरूणाच्या जबड्याला जबर दुखापत झाली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

महेश वसंत नलावडे ( ३२, रा. गांधीनगर वडार कॉलनी, चिपळूण ) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी विश्वनाथ हनमंत पवार ( ३५ ) व व्यकंट बद्री पवार ( ३०, दोघेही रा. खेर्डी माळेवाडी, चिपळूण) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. महेश नलावडे हा सेंट्रीग साहित्य आणण्यासाठी बहादूरशेखनाका येथे गेला होता. येथील भगवती हार्डवेअरचे दुकान बंद असल्याने त्याच्या समोर गाडीजवळ थांबला असताना त्याच्या ओळखीचे विश्वनाथ पवार व व्यंकट पवार या दोघांमध्ये अचानक समोरच भांडण सुरू झाले. त्यांचे भांडण सोडवण्यासाठी तो पुढे गेला असता त्या दोघांनी महेश नलावडे याला शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यानंतर त्याला खाली पाडून दगडाने उजव्या जबड्यावर मारहाण केली. यामध्ये महेश नलावडे याच्या जबड्याला गंभीर दूखापत झाली आहे. त्याप्रमाणे मारहाण करणाऱ्या दोघांवर भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ११५ (२) ११८ (१) ३५२, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!