WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

चिपळुणात टिपू सुलतान मुर्दाबादच्या घोषणा


चिपळुणात टिपू सुलतान मुर्दाबादच्या घोषणा

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या विधानाचा भाजपकडून तीव्र निषेध

चिपळूण : भारतीय जनता पार्टी चिपळूण शहर व ग्रामीण यांच्या वतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केलेल्या विधानाचा तीव्र निषेध करण्यात आला. सकपाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करून त्यांना समकक्ष ठरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत भाजपच्या वतीने चिंचनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. या वेळी हर्षवर्धन सकपाळ, टिपू सुलतान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आला.

या वेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. तसेच सकपाळ आणि टिपू सुलतान यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. संबंधित विधान हे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का देणारे असून शिवप्रेमींच्या भावना दुखावणारे आहे, असा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला.

आंदोलनात रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भुरण, जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, शहर मंडळ अध्यक्ष शशिकांत मोदी, शहर सरचिटणीस सौ. सारिका भावे, विनायक वरवडेकर, युवा अध्यक्ष शुभम पिसे, नगरसेवक संदीप भिसे, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, नगरसेविका अंजली कदम, शीतल रानडे, रत्नदीप देवळेकर, रुही खेडेकर, अभिषेक राजापूरकर, साहिल ताम्हनकर, स्वाती देवळेकर, कुणाल आंबेकर, नरेंद्र बेलवलकर, प्रणिता घाडगे, माधुरी शिंदे, प्रणय वाडकर, महेश कांबळे, प्रीतम इंगवले, निशा कोलगे, अमेय सुर्वे, सुदेश जाधव, दिपक शिंदे, महेश शिंदे, प्रतीक गोरिवले, दिनेश अपिष्टे, मंदार ठासले, विनय दाते, परेश मोरे, राकेश भुरण, संदीप कोलगे, गणपत शिंदे, गोपीनाथ शिंदे, अभिषेक जागुष्टे, स्वाती पटवर्धन, स्वानंद रानडे, पूजा कदम, विलास चव्हाण, निनाद आवटे, प्राजक्ता टाकळे, जनार्दन पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!