WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

मानाच्या ताटावरून वाद; ज्येष्ठ नागरिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण


मानाच्या ताटावरून वाद; ज्येष्ठ नागरिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण

चिपळूण : शहरातील ओझरवाडी येथील शंकर मंदिर समोर मानाच्या ताटावरून झालेल्या वादातून ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी २९ एप्रिल रोजी दुपारी २.३० ते ३ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी चिपळूण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यशवंत कृष्णा फके ( ७३, रा. ओझरवाडी, शंकरमंदिर समोर, चिपळूण) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी फके यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे राखणेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जेवणातील मानाचे ताट देण्याच्या कारणावरून फिर्यादी व संशयित आरोपी यांच्यात वाद निर्माण झाला. वाद वाढल्यानंतर संशयित आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून अंगावर धाव घेतली.

फिर्यादी घरात गेल्यानंतर संशयित आरोपी अक्षय करंजकर, गणेश शंकर आग्रे, प्रतिक घेवडेकर व मंदार गुरव हे घरात घुसले. त्यांनी यशवंत फके यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कमरेवर व पाठीवर मारहाण केली. तसेच प्रतिक घेवडेकर व मंदार गुरव यांनी उजव्या पायाच्या खुब्याजवळ लाथ मारल्याने फके यांचा पाय फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, संशयित आरोपींनी फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!