महाराष्ट्राचे ‘दादा’ गेले!
राज्याला मोठा धक्का ! विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू, विमान जळून खाक
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे. ताज्या अपडेट्सनुसार या विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचा आणि आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची अपडेट समोर येत आहे. तर विमान जळून खाक झालं आहे.
आज सकाळीच राज्याला हदरवणारी बातमी समोर आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झाला आहे. या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. ताज्या अपडेटनुसार, या विमान अपघातापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दादांन घेऊन जाणारं छोटं विमान हे जळून खाक झालं आहे. बारामती दौऱ्यासाठी ते आले होते. विमानतळाजवळच हे विमान कोसळलं. या अपघातात दादांचं दोन सहाय्यक, पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या वृत्ताने राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अजितदादांनी प्रचार सुरू केला होता. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीसाठी एकत्र आल्या होत्या. महानगर पालिका निवडणुकीचा निकाल पाहता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी त्यांनी प्रचाराला वेग घेतला होता. हा अपघात नेमका कशामुळे झाला. तांत्रिक बाब काय, या सर्व प्रकरणाची चौकशी विमानतळ प्रशासनाने सुरू केली आहे.
विमान बारामती विमानतळावर लँड करण्याचा प्रयत्न करत असताना ते दुर्घटनाग्रस्त झाले.
काही वृत्तांनुसार विमान तुकडे तुकडे झाले आणि आगही लागली आहे.
पवार यांच्यासह एकूण ५-६ जणांचे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, यामध्ये पायलट आणि इतर सहप्रवासीही आहेत.
बारामती विमानतळावरून विमाने काही काळासाठी स्थगित करण्यात आली आणि मदतकार्य सुरू आहे.
राजकीय व सामाजिक प्रतिक्रिया
अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रतिष्ठित नेते आणि आर्थिक धोरणांचे महत्त्वाचे हस्ती होते. त्यांच्या अचानक मृत्यूने राज्यात भावनिक उद्वेग व शोककळा पसरली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास प्रकल्प आणि अर्थसंकल्पीय धोरणे राबवण्यात आली होती, ज्यामुळे त्यांनी जनतेच्या मनात विशेष स्थान मिळवले.
धर्मादायी कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत, आणि विविध पक्षांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत; शोकसभा आणि श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित होत आहेत. याबाबत अधिकृत शासन विधान आणि तपशील अद्याप जारी होण्याची प्रतीक्षा आहे.











